0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज (बुधवार) शेवटचा दिवस ठरु शकतो.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी असे संकेत दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज 39 वा दिवस आहे. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद आज पूर्ण करण्यास सांगण्यात आलेय. अयोध्या प्रकरणाची सुनावणी आता शेवटच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.
हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी सांगितल्यानुसार,
  आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.  त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा होणार आहे. मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा पूर्ण झाल्यास आजचा निकाल सुरक्षित ठेवला जाणार आहे. मात्र न्यायालय काय निश्चित करणार यावर सगळं अवलंबून असेल. सर्वोच्च न्यायालयकडून गुरुवारी दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांचा वेळ दिला जाईल. यामध्ये दोन्ही पक्षकारांना कोणत्या प्रकारचा दिलासा हवाय, हे विचारले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण होईल. हिंदू पक्षकारांना एक आणि मुस्लीम पक्षकारांना एक तास देण्यात येईल. तर युक्तीवादासाठी दोन्ही पक्षकारांना 45-45 मिनिट देण्यात येतील.

Post a comment

 
Top