0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बदलापुर  |
दीपावलीचे औचित्य साधुन विवेकानंद केंद्र,कन्याकुमारी बदलापुर शाखा,तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,तसेच वनवासी कल्याण आश्रम,कल्याण यांच्यावतीने आदीवासी पाड्यावरील बांधवांची दीवाळी गोड व्हावी या विचारातुन वांगणी येथील बेडीस पाड्यावर फराळ वाटप करण्यात आले.दीवाळीच्या पहिल्या दिवशी बेडीस पाडा व दुस-या दीवशी सावरा येथील काही आदीवासी पाडे मिळुन 1500 लोकांना फराळ देण्यात आला.तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,चंद्रगुप्त नगर,व वनवासी कल्याण आश्रम कल्याण यांच्यावतीने बिर्ला काँलेज जवळील कातकरी वस्तीमध्ये फराळ,भेटवस्तु,व शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले.तसेच शहापुर तालुक्यातील आदीवासी पायर पाडा येथे भाऊबीज भेट म्हणुन महिलांना साड्या,पुरुषांना शर्टपीस,व कुटुंबासाठी फराळताट देण्यात आले.दीपाळी प्रित्यर्थ दोन दीवस आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी पराग बुवा रामदासजी,मिनाताई देशपांडे,विनय कुलकर्णी,महेश जोशी,एकनाथ गायकर,प्रमोद जोशी,नेमाडे सर,रवि घोरपडे,मधुसुदन ओक,नेत्रा ओक,स्नेहल ओक,अरविंद बुधकर,अनिरुध्द वाळींबे,मिलिंद चौधरी,भरत वंजारी,सोमभाऊ मुदळा तसेच विवेकानंद केंद्र,राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ,वनवासी कल्याण आश्रम यांचे सर्व सहकारी व कार्यकर्ते यांच मोलाच सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Post a comment

 
Top