0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मुरबाड विधानसभा क्षेत्र मतदार संघात यापुर्वी भाजपा-सेना युती काँगे्रस राष्ट्रवादी,तद्नंतर भाजपा,शिवसेना,मनसे,काँगे्रस राष्ट्रवादी,अपक्ष अशा लढती झाल्या त्यामध्ये शिष्याने गुरूला पराभुत केले मात्र,2019 ची निवडणूक दादा बाबाच्यात रंगली असून भाजपा राष्ट्रवादी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
          मुरबाड विधानसभा निवडणूकीत 2009 मध्ये राष्ट्रवादीने अंबरनाथचे आमदार किसन कथोरे ( Kisan Kathore ) यांना मुरबाडमध्ये उमेदवारी दिली त्यावेळी गोटीराम पवार ( Gotiram Pawar ) अपक्ष लढले आणि अल्पशा मतांनी पराभूत झाले त्यावेळी वामन म्हात्रे ( Waman Mhatre ) मनसे मधून लढले होते.
          2014 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार भाजपात गेले त्यावेळी राष्ट्रवादीचे गोटीराम पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आणि वामन म्हात्रे शिवसेनेतून लढले.त्यांनाही 15 हजार फरकाने गोटीराम पवार,किसन कथोरे यांच्या समोर पराभुत झाले.त्यांच्या मतांची आकडेवारी पाहिली तर बदलापूरकरांनी किसन कथोरे,वामन म्हात्रे यांना प्रचंड मते दिली आणि गोटीराम पवार स्थानिक बदलापूरचा नाहीत म्हणून 10 हजाराच्या आत मते मिळाली परंतु 2019 ची निवडणूक मुरबाड,बदलापूर,कल्याणच्या आवडत्या मतदाराची आणि नाराजीच्या सुराची आहे.जातीपाती धर्माची नाही मात्र,काही लोक सोशल मिडीया आपआपसात जातीचा प्रचार करतात अशी चर्चा आहे परंतू आत्ताची निवडणूक जाती धर्माची नाहीच मात्र,सुसज्ज निवडणूक प्रशासनाची आहे.
          निवडणूका आल्या की ,जातीचा कार्ड काढला जातो मात्र,ज्यांनी ज्यांनी जातीचा आधार घेतला त्या बोलघेवडयांनी जातीच्या गोरगरिब शेतकरी,कष्टकरी,शालेय विद्दयार्थी,बेरोजगार यांच्यासाठी काय केलं सांगावं,कधी शाळेची फीस कमी केली,कधी विद्दयार्थुांना कोर्स करण्यासाठी मतदत केली,दवाखान्यात मदत केली का ? लग्न समारंभ?नोकरीसाठी मदत केली का ? किती वेळा समाजातील इतर समाजातील लोकांच्या घरी गणपतीला दर्शनासाठी गेले,कार्यक्रमाला गेले त्यांना आर्थिक मदत केली याचे उत्तर देणारे खरे जातवान असतील अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.केवळ तुमच्या आणि तुमच्या बगाबच्च्यांसाठी प्रत्येक निवडणूकीच्या तोंडावर जातीवर मतांची भिक मागणारे काहीही अफवा करतात,निवडूण जातात मात्र,सुशिक्षीत मतदार यांना वळी पडून् शकत नाही त्यामुळे जातीचं कार्ड जळालं आता
          मुरबाड विधानसभा निवडणूकीत खरं तर गेल्या सर्वच निवडणूकीत आपआपल्या कोणत्या नेत्यांनी पाडलं,कोणाला घडवलं या जखमा अद्दयाप पुर्णपणे भरलेल्या नाहीत.दुसरीकडे माजी आमदार गोटीराम पवार यांचे राजकीय अस्त ज्यांच्या विज्याने कमी झालं त्यांच्याशी दिलजमार्इ भाजपाला साथीची ठरले काय ? असा सवाल मतदारांत केला जात आहे.
          मतदारांना बदल हवा आहे आणि असतोच मात्र,मुरबाड विधानसभेत 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत ज्यांची तमाम विधानसभेतील मतदार जनतेला साथ हवी आहे त्यांना मतदार निवडून देतीलच त्यासाठी कोण्या राजे-श-हची गरज भासणार नाही.एक मात्र खरं,मुरबाड तालुका घडतोय आणि मोडतोय सुध्दा अशा विधानसभाक्षेत्रात खरी लढार्इ भाजपा आणि राष्ट्रवादीतच आहे.
          ज्या शिवसेनेला भाजपाने डवचळली ज्या राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना सेनेत पळून लावले त्यांच भाजपाला सेनेची गरज लागली मात्र,प्रत्येक कार्यकर्त्यांवर पक्ष दबाव वापरून मदत करायला लावेलच असे नाही.दुसरीकडे यापुर्वी राष्ट्रवादीत गटबाजी बंडखोरी होत असे मात्र,येथे भाजपाचे निष्ठावंत राम पातकर,म्हात्रे,माजी आमदार दिगंबर विशे यांनी उमेदवारी जाहिर होण्याआधी किसन कथोरे यांना दर्शवलेला विरोध मावळला का ? यांच गाठीत निवडणूकीची वजाबाकी ठरणार आहे.
          जिल्हापरिषद झाली,भाजपाने प्रटिष्ठेची केली त्यामध्ये माजी आमदार पुत्राच्या गटात जावून दुसर्‍या तालु2यांचा उमेदवार उभा करून घाम फोडला,कृषी उत्पन्न बाजार समितीत काही आपल्याच उमेदवारांना घाम फोडून शिवसेनेची धावपळ उडवली त्यांच्या समोर भाजपा नेते कसे जाणार.
          मात्र,ज्या राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेत ठाणे जिल्हापरिषदेत युती करून सत्ता मिळवली त्याची जवळीक ज्या भाजपा विरोधात आहे त्यांची दिलजमार्इ एवढया लवकर होर्इल यावर मतदारांचा विश्‍वास नसल्याने या भाजपा राष्ट्रवादीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
          भाजपाला पहिले विजायाला मत दिले,त्यानंतरही विकासाला आज भाजपा विक्रमाला मत मांगते म्हणजे विकास पटलावरून गायब झाला आता विक्रमला शोधावा लागणार आहे.दुसरीकडे राष्ट्रवादीचे मडकं फुटलं मातीचं त्याला कोण साधविल अशी स्थिती आहे मात्र,काहीही नसताना वादळात हवा निर्माण करण्याचे काम केले हे नविन राजकीय समिकरण वाटत आहे.

          ज्या नेत्यांच्या डोक्यावर राज्याच्या नेत्यांचा हात असतो तो रेसमधील धावता…असतो त्यावर पैसे लावले जातात असा प्रकार घडला तर मग योग्य उमेदवाराला मतदारांनी स्विकारले असे होर्इल,येथील आजपर्यंतची मतदान आकडेवारी धोक्याची घंटा घेऊन फिरत आहे येथील स्थानिकांना,स्थानिक मिडीयाला डावळून जाणारा उमेदवार निवडूण जार्इल मात्र,त्याला खंत सतावत राहिल अशी स्थिती निर्माण होऊ नये हिच अपेक्षा.

Post a comment

 
Top