BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
नावाने
कोणी मोठा होत नसतो तो मोठा होतो ते केवळ त्याच्या कतृत्वाने त्याने सर्व सामान्यासाठी
केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्याचीै ओळख त्यास मोठं करते.मग कर्तृत्वान कधीच जात पात
धर्म बघत नाही.वेळोवेळी जो प्रसंगी धावला त्याच्याच रूपात खरा देव घावला असे म्हणतात.अशाच
प्रत्येक समस्यावर संकटावेळी ज्यांनी आर्इ,बहिण,एक महिला शक्ती म्हणून मदतीचा हात देत
मायेची सावली दिली अशा माऊलीच्या रूपातील सौ आशा यशवंत चोरघे यांना मुरबाड तालुक्यातील
शिरगाव येथिल सरपंच पदावर विराजमान झाले असल्याची बातमी समोर आली आहे.नेहमी सामाजिक
कार्यात अग्रेसर असणारी आशातार्इ या शिरगाव सरपंच पदावर होणार्या तिसर्या महिला आहेत.महिला
म्हणून त्यांनी गावाच्या प्रत्येक समस्यावर लक्ष केंद्रित केले असून सरपंच म्हणून त्यांच्या
कार्याला चांगलीच वाव मिळणार यात शंका नाही.पराकष्ट कधीच थांबत नाही आणि जोपर्यंत श्वास
आहे तोपर्यंत गावाची सेवा करत राहील असे सौ.आशातार्इ यशवंत चोरघे यांनी आमच्याशी बोलतांना
सांगितले आहे.आशाताईंची सरपंच म्हणून बिनविरोध निवड केल्याने मुरबाड तालुक्याबरोबर
शिरगावातील सर्व महिलावर्ग,ग्रामस्तांनी त्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे
अभिनंदन केले आहे.
Post a comment