BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं, पण इथे कसलीच प्रगती नाही. मी
लोकांना विचारलं तुमचा दत्तक बाप आहे कुठे? या मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची
नाशिकला गरज नाही. आमच्या बापात दम आहे असं त्यांना सांगा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे
अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. फडणवीस, बाड-बिस्तार बांधा
24 तारखेनंतर तुम्हाला नागपूरला परत जायचं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.सध्या पैलवानच
शिल्लक नाही या मुखमंत्र्यांच्या वक्तव्याला शरद पवारांनी उत्तर दिलं. समोरचा पैलवान
तुम्हाला दिसत नाही पण 24 तारखेनंतर तुम्हाला तेल लावलेला पैलवान दिसेल. लक्षात ठेवा
मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्हाला रेवड्यांवर कुस्ती खेळणारा पोरगाही सरळ
करेल, असा टोला यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
Post a comment