0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुसळधार पडणा-या पावसात सार्वजनिक बांधकाम उपविभागतर्फे कासगांव खुटल (बं) रस्त्यावर ठेकेदारानी डांबरानी खडडे बुजवण्यात आले.
19 ऑक्टोंबर पासुन 22 ऑक्टोंबर पर्यंत मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडला याचं कालावधीत डांबराने रस्त्यावर खडडे बुजवण्यात आले मात्र त्याचं वेळी पिडब्युडीचे शाखा अभियंता उपअभियंता कोणीही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते ठेकेदार अधिका-याच्या पाटर्या साज-या होत असुन पिडब्युडी कार्यालय ठेकेदाराचा भ्रष्टाचारी अडडा बनला आहे.
या ठेकेदारानी शाखा अभियंता,उपअभियंता,मुरबाड कार्यकारी अभियंता,ठाणे इस्टीमेंट तपासणीक, ऑनलार्इन टेंडर क्लार्क,आकांऊन्टर यांना लाखो रूपये देवुन कामे ठेकेदारी मॅनेज केली आहे.
हजारो कोटीचा भ्रष्टाचार मुरबाड तालुक्यात गेल्या 15 वर्षात झाला असुन गेली 35 वर्षे असाच भन्नाट भ्रष्टाचार सुरू आहे.राजकीय ठेकेदार अधिकारी यांची मिलीभगत शासनाचा निधी निकृष्ट कामे करून हाडप करत आहेत.याकडे आता केंन्द्र सरकारने लक्ष वेधावे अशी मांगणी नागरिकांनी केली आहे.

Post a comment

 
Top