0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
ज्या मोदीच्या,शहाच्या गुजरात मध्ये सायकल..सायकल.. ओ.. म्हारी सोनारी सायकल..’’ यांच सायकलवर मुरबाडच्या राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रमोद हिंदुराव डागदार नाही दमदार नेता बॅनर लावून खेडयापाडयात प्रचार सुरू केला आहे.
            मतदारांना आकर्षित करण्यासाठी सायकल सायकल ओ म्हारी सोनानी सायकल या गाण्याची लगेच आठवण प्रत्येकाला होते.मुरबाड विधानसभा मतदार संघात अनेक समस्या आहेत.आरोग्याची समस्या जीवघेणे बनली आहे याकडे सत्ताधारी विरोधक दोघांच दुर्लक्ष झालं मात्र,आता मुरबाडला विरोधीपक्ष उरलाच नाही.सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून सत्तेत सारे गप्प बसलेले आज मताची भिक लोकांसमोर मागत आहेत.एकीकडे सत्ताधारी आमदार यांच्या सोबत प्रचारात कोण फिरतात याची चर्चा आहे,दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांच्या बरोबर कोणी फिरत नसताना सहानुभुती गर्दी किती असते याबद्दल मतदारात उत्सुकता वाढली आहे.निवडणूका येतातAजातात मात्र,पराजय कोणामुळे झाला याचा कानोसा निकाला नंतर घेतला जातो मात्र,आज पाच वर्षातील राग,संघर्ष,मुस्कुटदाबी,अन्याय,दडपशाही बाहेर काढण्याचा प्रयत्न होतांना दिसतोय.फिरणारे मत देतील मात्र,त्यांचे घरातील मत दान हार्इलच का आणि कोणाला हे गुपीतच आहे.स्थानिक सर्व घटकांपासून रोजगार हिरावून मुंबर्इ वाल्याच्या नादी लागून निवडणूका उरकून घेण्याचा काम आजही पॅकेजामध्ये सूरू आहे.बातमी मागची बातमी मताची बेरीज कमी करित आहे हे सारं करणारे कोण याबद्दल बोलतांना तोंड दाबून मुक्याचा मार यांचा परिणाम नेहमी सत्ताधार्‍यांवरच होतो.याबद्दल शंका नाही.
            मुरबाड तालुक्यात भाजपा,यापुर्वी शिवसेना,राष्ट्रवादी,अन्य पक्षाशी कशी वागली,व्यापारी गाळे घोटाळा मुरबाड शहारातील रस्ते घोटाळा,धसर्इ रानपुर,वाल्हिवरे पर्यटन स्थळे,माळशेजघाट मुरबाड म्हसा,डोळखांब तोकावडा,किन्हवली माजगांव असे शेकडो रस्ते बोगस कामे यावर हजारो कोटीच्या निधीत भ्रष्टाचार घोटाळा भाजपाला घातक ठरणार आहेच त्यांच बरोबर मुरबाड शहरातील नगरपंचायत निवडणूक,जिल्हापरिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत,कृषी उत्पन्न बाजार समिती बारवी धरण प्रकल्प ग्रस्त अशा अनेक गोष्टीची आठवण झाल्यास भाजपाचे मनोबल कसे वाढेल याबद्दल शंका आहे.
            स्थानिक इतर सामाजिक कार्यकर्ते,पक्ष कार्यकर्ते स्थानिक पत्रकार यांना कधीही विश्‍वासात न घेता बाहेरिल लोकांना कार्यकर्त्यांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना जवळ करण्याच्या प्रसंगाचे आत्मचिंतन सत्ताधार्‍यांना करावं लागेल.
            एवढा विकास,एवढी तळमळ मग सगळी मळमळ एकत्र आणण्यास आपण कमी पडलो का यांचे आत्मपरिक्षण होर्इलच मात्र,येत्या निवडणूकीत राष्ट्रवादी भाजपा आमने सामने भारदार नेतृत्वाने लढत देत आहे.एकाच घडयाळयाचे सर्व काटे आमने सामने आहेत मात्र,काटे वेगळे झाले तरी घडयाळ जशाच तसा आहे.त्यात दुरूस्तीचे काम मतदार करताना लहान काटे जवळ येतील कारण लहान काटे घडयाळातच असतात मोडला तर 12 चा काटा मोडतो मात्र त्याजागी 12 बॉल्याचा काटा चिटकवण्याचा काम कारागिर करतो अशीच परिस्थिती मुरबाड मतदार संघात झाला आहे.दुसरीकडे मुरबाड तालुक्यात गेल्या 10 वर्षात विकास झालाचं आहे.त्याला नाकारता येणार नाही मात्र,त्यांच्या विकासाला तडा देणारे त्याचेच समर्थक असतील.व्यक्ती महान असते कोणी वार्इट नसतंच मात्र,माणसं वापरण्यापेक्षा पारखून गोजरवीणारा लागतो मात्र तसे घडत नाही.ज्याची सत्ता त्यांच्याकडे धावणारे खुप आहेत.ज्यांनी खस्ता खाल्या त्याची हालत कठीण.पुन्हा सत्ताधारी पराभूत झाले की हे पुन्हा स्वगृही आज सत्ताधार्‍यांकडे ठेकेदारी,शाळा,कॉलेजसाठी बिल्डर्स आहेत हे पाहिले यांच घडयाळयाच्या डबर्‍यात होते आज फुलात बनात असतील,नवा भिडू येऊ दे दादा तुमच्या बरोबर दिसतील तुम्ही सुध्दा घ्याल त्यांना हे बरं नव्हे.

Post a comment

 
Top