0
BY - युवा महाराष्ट्र लाइववाडा |
वाडा तालुक्यातील दिनकर पाडा येथील एका विवाहीत महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असुन मृत्यु पावलेल्या महिलेच्या नातेवार्इकांनी सासरंच्या मंडळी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.वाडा तालुक्यातील दिनकर पाडा येथील सचिन प्रकाश चौधरी यांच्याशी आतकोली पडघा गावातील अक्षता भास्कर राऊत हिच्याशी दिड वर्षापुर्वी लग्न झाले होते त्याना तीन महिण्याचा मुलगा आहे.सचिन चौधरी हा लग्न झाल्यापासुन हुंडयासाठी अक्षता हिचा मानसिक शारिरीक छळ करत होता त्यातुनच तिचा सचिन चौधरी व 5यांच्या घरातील लोकांनी खुन केल्याचा आरोप मृत्यु अक्षताचे वडील भास्कर राऊत यांनी केला असून वाडा पोलिस ठाण्यात 306,498 (अ) 34 प्रमाणे सचिन चौधरी व त्यांच्या घरच्यांच्या विरोधात हुंडाबळी तसेच आत्महत्यास जबाबदार म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
            विशेष म्हणजे मृत्यु मुलीवर माहेरी आतकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.घटना घडल्यापासून सचिन चौधरी फरार असल्याचे समजते.पोलिसांना त्याला अटक करण्यास अपयश आले की जाणून बुजून अटक करत नाहीत असा संशय भास्कर राऊत यांनी व्यक्त केला आहे.

खुन की आत्महत्या याचा पुरावा सिध्द करण्यासाठी मयत अक्षता हिचा व्हीसीआरा जे.जे रूग्णालयात तपासणीसाठी पाठवला असून दोषीवर कठोर कारवार्इ व्हावी आरोपीतांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मयत मुलीच्या नातेवार्इकांनी केली आहे.मयत महिलेचा तीन महिण्याचा बाळ गावातील शेजार्‍याकडे असल्याचे कळते.

Post a comment

 
Top