0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक म्हणजे पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी एक मोठे विधान केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, या बँक घोटाळ्याचा सरकारचा काही संबंध नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देत आहे. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची भेट घेतली.निर्मला सीतारमण म्हणाल्या की पीएमसी बँकेच्या ग्राहकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी चर्चा करेन. तसेच निर्मला सीतारमण म्हणाल्या की बहु-राज्य सहकारी बँकांचे कामकाज सुधारण्यासाठी हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आणले जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाले की, पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात अर्थ मंत्रालयाचा थेट संबंध नाही कारण आरबीआय नियामक आहे.

Post a comment

 
Top