0
लेखक - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
आज नेता ओळखला जातो तो राजकीय क्षेत्राचा,समाजाचा त्या पलीकडे त्यांनी केलेला विकास आणि कार्यकर्त्यांच्या उध्दाराचा.ज्या नेत्यांची संपत्ती सुरूवातीला हजाराच्या  गिनली जात होती तो निवडणूकीनंतर करोडो रूपयाच्या क्षितीजावर चमकू लागतो.कार्यकर्त्यांचा तो नेता अन्नदाता होतो तर नेता हा आवडला की त्याचा ताप समर्थक होऊन जयजयकार करतो.मग बाबा,दादा,राजे-श-ही समोर येते.नेत्यांनी विकास केला असे जर म्हणता आले तर विकास हा कोणाचा केला हा पहिला प्रश्‍न समोर उभा राहतो तेव्हा उत्तर जन्म घेतो  सांगतो कार्यकर्ते,ठेकेदारांचा विकास.ग्रामीण भागात नेत्यामागे 100 फिरणारे यांनी बाबा,दादा,राजे-श-हाला मोठा केला परंतू हेच जेव्हा मंत्रालयात असतात तेव्हा त्यांना हटकणारा कोणीही नसतो केवळ 4 ते 5 समर्थक कार्यकर्ते ठेकेदार सोबत असतात.याचा उद्देश त्या नेत्यांची किंमत मंत्रालयाच्या आवारात कमी असते आणि आमचा बाबल्या आमचा नेता लय पावरफुल म्हणत नेत्याचं गुणगान गातो  बाबा,दादा,साहेब,दमदार असल्याचे गावभर सांगत फिरतो तेव्हा युवा तरूणांच्या मनातील प्रश्‍न निर्माण होतो.रस्ते केले,इमारती बांधल्या परंतू आमच्याच नेत्यांनी आमच्यासाठी काय केलं ? जर याला विकास म्हणतात तर विकास कोणाचा केला ? हा विकास केवळ त्यांच्याच माणसाचा केला.विकासाची व्याख्या म्हणजे इकडून तिकडून रस्ते जोडणे,इमारती बांधणे,अधिकार्‍यांना आपल्या शिफारस पत्राने आणणे,भ्रष्टाचाराला पाठिंबा देणे,सर्व  तक्रारीकडे दुर्लक्ष करणे नव्हे तर विकास जर खर्‍या अर्थाने करावयाचा झाला तर ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील एका तरूण,तरूणीला रोजगार देऊन गरिबी दूर करणे हाच खरा विकास म्हणता येर्इल.परंतू नेत्यांचा विकास नावावर मोर आणि मनातून कामचोर असा झाला आहे.विकासाच्या नावावरील हवा वाहत असताना हा विकास हवेबरोबर भरकटू लागला आहे.निवडणूका आल्या  गरिबांचे दार आणि त्यांची ओंजळ आठवते त्या गरिबीची जाण आजतागायत यांनी जानलीच नाही.निवडणूकीच्या तोंडावर नेता समाजच्या नावाने मताचे भिक मागत फिरतो परंतू जनता आणि तरूण सुशिक्षित झाली आहे.त्यांनी समाजापेक्षा नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचा संकल्प केला आहे.त्यांना राजकारण हा जुगार असल्याचे कळून आले आहे.कारण कालपर्यंत जे विरोधात होते ते आज  मांडीला मांडी लावून बसत आहेत.एकमेकांचे गुणगान गात समाजाच्या नावावर निवडून येण्याचा डंका वाजवित आहे.अशा नेत्यांची सुशिक्षितांनी चांगलीच चव ओळखली असून पुरणाच्या पोळी एैवजी राजकारणाची गोळी ही कडू आहे कळून आहेत.त्यामुळे आमच्या एम.आय.डी.सी कंपन्या,कौशल्याच्या माध्यमातून रोजगार याकडे लक्ष घाला तेव्हा आम्हाला म्हणता येर्इल का ? की,आमच्या जिवावर निवडूण येणारे,समाजाचा सहारा  नेत्यांनी आमच्यासाठी काय केलं म्हणून. (क्रमशः उर्वरित भाग उद्दया…)

Post a comment

 
Top