0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |
बापजन्मात मी कोणताही गुन्हा केला नाही. तरीपण सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) माझ्यावर गुन्हा दाखल केला. ईडीला काय चौकशी करायची ती करू दे, लय बघितलेत असले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ते मंगळवारी इस्लामपूर येथे प्रचारसभेत बोलत होते.राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी शिखर बँकेचा संचालक किंवा सभासद नसताना ईडीने माझ्यावर गुन्हा नोंदवला. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा, आम्हाला त्याची चिंता नाही. अशा खूप कारवाया पाहिल्या असल्याचे पवार यांनी म्हटले.  

Post a comment

 
Top