0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
माजी कर्णधार सौरभ गांगुली यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI च्या नव्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली (दादा) यांची निवड होण्याची शक्यता आहे. 23 ऑक्टोबर रोजी BCCI ची निवडणूक होणार असून मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सभेत हा महत्वाचा निर्णय होऊ शकतो. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित झाली आहे. या पदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्यातुलनेत गांगुलीला अधिक पसंती मिळत आहे. यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होऊ शकते. अरूण धुमाळ हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत. जर गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली तर ते सप्टेंबर 2020 पर्यंत या पदावर राहू शकतील. 

Post a comment

 
Top