BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव
आहे.21 तारखेत सर्व मतदारानी हक्क बजवावा असे आहवान युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही
चॅनेल व स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्रानी केले आहे.महाराष्ट्रात 8 कोटीच्या वर मतदार
असुन 96 हजाराच्यावर मतदान केंन्द्र आहेत.त्यासाठी 6 लाख 50 हजार प्रशासकीय कर्मचारी
नियुक्त करण्यात आले असुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.रात्रदिवस अधिकारी कर्मचारी
ताणतणाव सहन करून प्रशासकीय सेवा बजावत आहेत.राज्यात भाजपाचे 164 उमेदवार राष्ट्रवादीचे
121,काँग्रेस 147,शिवसेना 123 ब्सपा 262 वंचित बहुजन आघाडी 235,मनसे 105,एम.आय.एम
44 इतर व अपक्ष 1900 च्यावर असे उमेदवार 288 जागांसााठी लढत आहेत.कुठे शिवसेना x राष्ट्रवादी,कुठे
काँग्रेस x शिवसेना काही ठिकाणी शिवसेना इतर भाजपा विरूध्द x राष्ट्रवादी तर काँग्रेस विरूध्द x भाजपा,अपक्ष विरूध्द x भाजपा अशी लढत होणार आहे.राष्ट्रवादीचे 60 उमेदवार भाजपा विरोधात लढत आहेत,काँग्रेसचे
94 उमेदवार भाजपा विरोधात लढत आहेत,दुसरीकडे शिवसेने विरोधात काँग्रेसचे 52 उमेदवार
आणि शिवसेना विरोधात राष्ट्रावादीचे 57 उमेदवार तसेच 10 ठिकाणी भाजपा विरूध्द अपक्ष
तर 15 ठिकाणी शिवसेना विरूध्द इतर उमेदवार रिंगणात आहेत.
सन 2019 ची महाराष्ट्रातील निवडणूक आगळी वेगळी दिसत आहे.प्रमुख
नेत्यांच्या विरोधात कणखर उमेदवार दिसत नाहीत.ज्यांच्यावर पक्षाची स्टारप्रचारक जबाबदारी
आहे.दुसरीकडे भावनिक,रडारडी खर्चावर बंधने यावरून महाराष्ट्रातील ही निवडणूक फिक्सींग
वर नाही ना ? असा संशय व्यक्त केला जातो मात्र,मतदार योग्य उमेदवाराला निवडूण देतील
यात शंका नाही.
ग्रामपंचायत,नगरपंचायती,महानगरपालिका यामध्ये मताला प्रचंड दाम
दिला जात होता परंतू विधानसभा निवडणूकीत सर्वच पक्षांनी दामाला मोडत काढून खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला.काही उमेदवाराच्या
भारदस्त यापुर्वी होणार्या जाहिरसभा झाल्या नाहीत.जणू काही राजकारण्यांनी शहरे,ग्रामीण
भाग वाटूनच घेतले अशी प्रथमच ऐतिहासिक निवडणूक पार पडत आहे.जेवढा खर्च 288 मतदार संघातील
उमेदवाराचा झाला नाही त्यापेक्षा जास्त खर्च शासनाचा 288 लोकप्रतिनिधी निवडीसाठी झाला
आहे.भविष्यात राजकारणात पारदर्शका येर्इल असं वाटतंय मात्र,प्रशासनात पारदर्शका आणण्यासाठी
जणता कोणाच्या हातात सत्ता देते याकडे 21 तारिख उद्दयाचा दिवसवाट पाहत आहे.
Post a comment