0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – गडचिरोली |
पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा आणि हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून चातगाव दलमच्या 7 नक्षलवाद्यांनी आज (बुधवार) गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. संपूर्ण दलम सदस्य आत्मसमर्पण करण्याची बहुतेक ही पाहिलीच वेळ आहे. या सातही जणांवर जाळपोळ, भूसुरुंग, हत्या असे विविध स्वरूपाचे गुन्हे असल्याने शासनाने त्यांच्यावर 33 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. राकेश उर्फ गणेश सनकु आचला (वय ३४ वर्षे) माओवादी असून तो जून २००६ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. जानेवारी २०१२ पासून ते आजपर्यंत तो माओवाद्यांच्या चातगाव दलमच्या कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर २० चकमकीचे, ७ खुनाचे, ०२ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ०५ लाख ५० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

Post a comment

 
Top