0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही मुरबाडमधील तोंडलीकरनगर,माऊली नगर नवीन वसाहत यांच्या वतीने 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन पुज्य भंते अनुमोदस्सी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.08 ऑक्टोबर 2019 रोजी मा.नागेशजी  यांच्या अथ्यक्षतेखाली संपन्न होत आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मुरबाड येथे सकाळी 9.30 वा सर्व धम्मबांधव,बंधु भगिनींनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सकाळी 10 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मुरबाड ते कुणबी समाज हॉल पर्यंत धम्म रॅली,11 वाजता प्रतिमेचे पुजन व पुज्य भंते अनुमोदस्सी यांची घम्मदेसना,12 वाजता आयु.अरविंद  सर यांचे धम्म प्रबांधन व दुपारी 1 वाजता भोजनदान अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.सदर कार्यक्रमाचे ठिकाण कुणबी समाज हॉल,म्हसा रोड मुरबाड असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Post a comment

 
Top