BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
ऑक्टोबर महिना संपायला आता फक्त 14 दिवस उरले आहेत मात्र, या 14
दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बँका बंद राहणार आहेत. या 14
दिवसांपैकी सहा दिवस बँकेचं कामकाज होणार नाही त्यामुळे जर तुमचं बँकेचं कुठलं
महत्त्वाचं काम राहिलं असेल तर ते लगेच करुन घ्या.31 ऑक्टोबरपूर्वी वेगवेगळ्या
कारणांसाठी देशातील अनेक बँका बंद राहातील न्यू एजन्सी
पीटीआयनुसार, 10 बँकांच्या विलिनीकरणाविरोधात 22 ऑक्टोबरला बँक संघटनेने संप
पुकारला आहे.अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक कर्मचारी
परिसंघाच्या या संपाला आता ट्रेड युनिअन काँग्रेस (एटक) ने ही समर्थन दिलं आहे. जर
हा संप झाला तर 22 ऑक्टोबरला बँका बंद राहातील.
Post a comment