0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – रायगड |
आंबेनळी घाटात पुन्हा एकदा बस कोसळल्याची घटना समोर आली आहे. 200 फूट खोल दरीत ही बस जवळपास 40 फुटांपर्यंत घसरल्याची घटना घडली आहे. बसमध्ये 70 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी 18 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अक्कलकोट-महाड बस पोलादपूर पायटा येथे घाटामध्ये कोसळली. जखमी रुग्णांना उपचारांसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

Post a comment

 
Top