BY -
युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
|
राज्यभरात सर्वत्र
मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सकाळी
मुंबईतील मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शरद पवार
यांनी बातचीत केली. “काल मी टीव्हीवर बघत होतो, त्यावेळी
त्यांनी आमच्या विरोधी पक्षनेत्यांबद्दल आरोप केले होते. त्यांनी 40 मिनिटे भाषण केलं.
तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यानंतर त्यांना चक्कर आली. मला समजत नाही, तुम्ही 40 मिनिट
भाषण करू शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला चक्कर कशी येते?” असा प्रश्न शरद पवार यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
यांच्यावर केली.
Post a comment