0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मार्गावर मेट्रो-4 प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातही विविध विकास प्रकल्पांसाठी तीन हजार 880 झाडे तोडण्यात येणार आहे. मात्र झाडे तोडण्याच्या निर्णयावरील मनाई आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आता 3 डिसेंबरपर्यंत कायम ठेवले आहेत. ठाणे वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी अॅड. अंकित कुलकर्णी यांनी  जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस करण्यात आली.यासंदर्भात ठाणे महापालिकेने प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे. त्यामुळे खंडपीठाने पालिकेला मुदत देतानाच पालिकेच्या उत्तरावर याचिकादारांनीही आपले उत्तर प्रतिज्ञापत्रावर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.  यासोबतच झाडे तोडण्याचा पूर्वी मनाई आदेशचा आदेश कायम राहणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. 

Post a comment

 
Top