0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
रेल्वे ट्रॅकवर तब्बल 36 लाखांचे 194 मोबाईल सोडून चार चोरटे पसार झाल्याची घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. भिवंडी पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलीस पसार आरोपींची शोध घेत आहेत.रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी रेल्वे ट्रॅकचा आजूबाजूला सक्रिय फटका गॅंग वर नजर ठेवण्यासाठी पथक तयार केले आहे. प्रत्येक रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये एम एस एफ आणि रेल्वे जी आर पी पोलीस यांच्या एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दररोज ज्या ठिकाणी फटका पॉइंट्स आहेत त्याठिकाणी पेट्रोलिंग करत राहते. मंगळवारी कल्याण जीआरपीचे पथक कल्याण वालधुनी दरम्यान फटका पॉईंटवर पेट्रोलिंग करत होते. महाराष्ट्र सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीसचे जवान एन पी माने आणि बजरंग भोईनवाड यांची नजर रेल्वे रूळ ओलांडताना चार तरुणावर गेली. या चौघांपैकी तीन तरुणांच्या हातात तीन बॅग होत्या. पोलिसांनी या तरुणांना हटकले. चार तरूण आपल्या हातातील बॅग सोडून पळून गेले. जेव्हा या बॅगची तपासणी करण्यात आली. या बॅगमध्ये तब्बल 36 लाखांचे 194 नोकिया कंपनीचे मोबाईल सापडले.कल्याण जीआरपी पोलिसांनी हे सर्व मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू केला.

Post a comment

 
Top