0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली अर्पन केली आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. तर इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. इंदिरा गांधींच्या 35 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top