0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबर्इ |
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावनजीक ढालघर फाटा येथे अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरची बसला धडक बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये 30 प्रवासी जखमी झाले आहेत. त्‍यापैकी 7 जणांना मुंबईत हलवण्‍यात आले आहे. तर उर्वरीत जखमींवर माणगावच्‍या उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.मुंबईकडून दापोलीच्‍या दिशेने दोन टेम्‍पो ट्रॅव्‍हलर बसेस प्रवासी घेऊन निघाल्‍या होत्‍या. त्‍याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनरच्‍या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्‍याने या गाडयांना धडक दिली. या अपघातात दोन्‍ही वाहने पलटी झाली असून त्‍यांचं मोठं नुकसान झालं आहे. स्‍थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले व उपचारासाठी रूग्‍णालयात हलवले.

Post a comment

 
Top