0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यापूर्वी निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. यामुळे निवडणूक काळामध्ये तब्बल 32 लाख ट्विट्स करण्यात आले. यामध्ये निकालाच्या दिवशीचा हा आकडा सर्वात जास्त होता. ट्विटरकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे.महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला निवडणुका पार पडल्या. 24 तारखेला याचे निकाल जाहीर झाले. विधानसभा निवडणुकीसाठी assemblyelectons2019,maharashtraassemblyelectons,#maharsahtraassemblyelectons2019 हे 'हॅशटॅग' सर्वाधिक ट्रेन्डिंगमध्ये होते. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून हे हॅशटॅग वापरून मोठ्या प्रमाणात ट्विट्स करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटरने माहिती दिली की, या हॅशटॅगला जोडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच मनसेच्या नावानेही ट्विट्स केले जात होते. 

Post a comment

 
Top