BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
|
नुकतीच आपल्या इलेक्ट्रिक नेक्सन कारच्या लॉन्चिंगची घोषणा देशातील दिग्गज वाहन
निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने केली आहे. टाटा मोटर्स आपली नेक्सन ईव्ही
(Tata Nexon EV) झिपट्रॉन टेक्नोलॉजीसोबत मिळून पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करणार
आहे. 15 ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान या कारची किंमत असणार आहे. टाटा नेक्सन ईव्ही
ही कार एकदा चार्ज केल्यास 300 किलोमीटर धावेल असा दावा कंपनीने दावा केला आहे.
याबाबत मीहिती देताना टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझनेस आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटर्जीचे
अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, ही घोषणा करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे
की, आर्थिक वर्ष 2019-20 च्या शेवटच्या तिमाहीत टाटा नेक्सन ईव्ही ही कार लॉन्च करण्यात
येईल. झिपट्रॉन टेक्नोलॉजीचा वापर या कारमध्ये करण्यात येणार आहे.
Post a comment