0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
खर्‍या हिरोची तुलना कोणी करूच शकत नाही कारण तो कधी पडद्दयावर भुमिका साकारत नसून वर्तमानाची भुमिका साकारतो आणि ती भुमिका केवळ जनसामान्यांसाठी असते अशीच भुमिका जेव्हा समाजकार्यातून साकारली जाते तेव्हा त्या भुमिकेचा हिरो हा माणूसकीची जाण म्हणून ठरला असतो.अशी आण,बाण,शान म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेले आणि लाखो तरूणांच्या गळयातील तावीत बनलेले,अन्यायाविरोधात नेहमी त्यांचा लढा असतो,जेथे लढा शब्द येतो तेथे जात,पात माणला जात नाही माणली जाते तर त्याला मिळवून देणारी न्यायाची अस्मिता.ही अस्मिता ज्यांनी जपली असे तरूणवर्गांचे मार्गदर्शक देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांनी.त्यांच्या याच अस्मितेला मनाच्या हृदयातून सलाम करत त्यांना यंदाच्या हार्ट हिरोस् ऑफ दि हिरो 2019 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे आयोजन तेरणा स्पेशालिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर यांनी केले होते.प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे उपस्थित होते त्यांच्या शुभहस्ते तानाजी मोरे यांना सन्मानित करून पुरस्काराने गौरविण्यात आले.या प्रसंगी मराठी सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन श्री.देशमुख साहेब यांची प्रमुख उपस्थिती  लाभली.सामाजिक क्षेत्रात आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व युवक वर्गाला एकसंध करण्यात तानाजी भाऊ मोरे यांचा सिहांचा वाटा असून सदर पुरस्कार सोहळ्यावेळी त्यांच्या समवेत मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष आरती पितळे , देवा ग्रुप प्रवक्ते मिलिंद सोनार सर, मनोज पाटील मा.सरपंच नांदकर, संघटक रवी पाटील, मोहन हरड,गणेश शेलार,अंबरनाथ महिला अध्यक्ष अनुशा मुंडेकर, नवनाथ चव्हाण, मनोज पाटील, मॅक्स फोडसे इ. देवा ग्रुप फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते व सदरहू सभासदा मार्फत नेहमी समाजकार्यात भाऊसोबत सक्रिय सहभाग घेतला आहे.


Post a comment

 
Top