0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सर्वत्र जाहिर सभा होत असताना मुरबाड मध्ये 18 ऑक्टोबरला होणार्‍या सुप्रिया सुळे यांच्या जाहिर सभेला खुले नाटयगृहात परवानगी मागितली असता मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी नकार देताच राष्ट्रवादीसह मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यानी संताप व्यक्त केला आहे.भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असुन राष्ट्रवादी काँगे्रसच्या सभाना परवानगी नाकारली जात असून गटविकास अधिकारी भाजपाला छुप्पी मदत करत असल्याचे राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष जगन्नाथ गायकर यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांनी वरिष्ठ अधिकार्‍याशी संपर्क केला असुन खुले नाटय गृहाच्या पटंगणात सभा परवानगी न दिल्यास राष्ट्रवादी कार्यालयासमोर रस्त्यावर सभा घेण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे मतदानापुर्वीच मुरबाड मध्ये तणाव निर्माण करण्याचे काम गटविकास अधिकारी यांनी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जाते.भाजपाच्या नगरसेवकानी 72 गाले अनाधिकृत बांधले आहेत त्या अनाधिकृत बांधकामात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना निलंबित केले असुन त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मांगणी कार्यकर्त्यानी केली असुन न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. विधानसभा प्रसार रॅल्या चौकसभा गांवागांवात ग्रामपंचायत हद्दीत प्रभागात प्रचार करणार्‍या सभाना गटविकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम तहसिलदार यांनी परवानग्या दिल्या आहेत काय? त्यावरही कारवार्इ करावी अशा संप्तत प्रतिक्रिया उमटत असुन शांततेने चाललेल्या मुरबाड विधानसभा निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न गटविकास अधिकारी यांच्या आडमुठया धोरणामुळे होत असल्याचा संताप आता आंदोलनात उतरतय काय? याबद्दल नागरिकात संभ्रम आहे.खुले नाटय गृहात झालेली विकास कामे नवरात्रोत्सव लग्न समारंभ यांना गटविकास अधिकारी यांनी परवानगी दिली काय? गटविकास अधिकारी यांनी जागेवर बांधलेले अनाधिकृत गाले विक्री केली का? याचा जबाब गटविकास अधिकारी यांना आंदोलकाना दयावा लागेल निवडणुकीत जो निवडुण येर्इल तो येर्इल अधिकार्‍यांनी त्यामध्ये परवानग्या दयाव्यात नाही दिल्यास सभा झाल्यास काही अनुसुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण राहिल याकडे नागरिक पहात आहेत.परवानगी मिळाली नाही तर उदया मुरबाड बाजारपेठेत सुप्रिया सुळेची सभा होणार आहे असे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले.

Post a comment

 
Top