0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
महाराष्ट्र राज्यातील मुरबाड शहापुर सिंधुदुर्गासह ग्रामीण भागात 370 कलमाचा काय संबध त्यांचा प्रचार काय उपोयोगाचा येथे पडलेले खडे बुजवता येत नाहीत आणि म्हणतात हजारो कोटीचा विकास अशा फसव्या भाजपाच्या भुलथापाना बळी पडु नका असे आहवान माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुरबाड येथे केले आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रमोदजी हिंदुराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजितदादा पवार आले होते त्यावेळी ते जाहिर सभेत बोलत होते यावेळी राज्यात काँगे्रस राष्ट्रवादी मित्र पक्ष अगाडीच्या 175 जागा निवडुण येतील त्यामध्ये मुरबाड असेल असे भाकीत केले.
गेली 20 वर्षे प्रमोद हिंदुराव तिकीट मागत होते त्यांना यावेळी मुरबाडच्या सार्वजनिक विकास बेरोजगारी हाटवण्यासाठी उमदेवारी दिली असुन त्यांना प्रचंड मतानी निवडुन दया आम्ही मुरबाडकरांच्या पाठिशी आहोत असे अभिवाचन अजितदादा पवार यांनी दिले.
या सरकारने सत्तेचा गैरवापर केला ज्यांचा बँक प्रकरणात काहीही संबध नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.16 हजार शेतकर्‍यांना आत्म़हत्या कराव्या लागल्या 16 हजार माताभगिनी विधवा केल्या दडपशाही वापरली तडीपार डी नोटीसा देवुन त्रास दिला शिवरायांच्या किल्यावर हॉटेल निर्माण करून जुना इतिहास पुसण्याचा काम करणार्‍या या सरकारला मतदारानी धडा शिकवण्याचा आहवान केले.आमच्या कालावधीत कोणाला त्रास देण्याचा काम केला नाही.आम्ही दारू गुटखा डांन्सबार बंद केले त्यांनी सुरू केले त्यापुढे जावुन एकमंत्री म्हणाला बाइचा नांव दारूला दया एक म्हणाला तुम्हाला मुलगी आवडली त्यांना पळवुन आणुन देवू तुमच्या बापाची पेंढ आहे काय ? अशा शब्दात भाजपाच्या आमदार मंञ्यांच्या समाचार अजितदादा पवार यांनी मुरबाडमध्ये घेतला.समाजाची गरज भासवा दमदाटी पत्रकारांवर हल्ले हे बरे नव्हे जी एसटीने व्यापार्‍याचे कंबरडे मोडले आहे.दाभोळकर कुलकर्णी पानसरे यांच्या खुनाचे मारेकरी अवप सापडले नाही शिक्षकांची भर्ती नाही पोलिसांची भरती नाही वाहानाचे कारखाने बंद पडले आहेत एमआयडीसी मधील कारखाने बंद पडलेत बेरोजगारी वाढली आहे.
निवडणुका आल्यावर यांना राममंदिर आठवतात गुजरात मध्ये सरदार वल्लभाइचा पुतळा उभारला त्यांचा आम्हाला अभिमान आहे मात्र आमच्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच स्मारक माहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आजही होऊ शकले नाही याबद्दल खंत व्यक्त करून आता बद्दल करायाचा आहे असे प्रतिपादन केले.गरीबाच्या जमिनी समृध्दी महामार्गाला घेतल्या प्रचंड भ्रष्ट्राचार केला बँका बुडवल्या लोक रडतात महागा वाढवली एकामेकात राग दोष करू नका एकत्र काम करून महाराष्ट्रात सत्ताआणा प्रमोद हिंदुराव यांना निवडुण आणा असे सांगितले.
मग पुरूषांची गरजच नव्हती
इकडे पंतप्रधान जगाच्या नकाशावर बोलतो आणि तो गुरूजी म्हणतो आंबा खाल्यावर मुलगा होतो मग पुरूषांची गरज काय काहीही वाटयाला बोलायाचे असा खरपुच समाचार भाजपाच्या आमदार मंत्रीसह भिडे गुरूजीचा घेतला .यावेळी शिवाजी चौक मुरबाड येथुन प्रमोद हिंदुराव यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली 
या रॅलीत हजारो कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.प्रमोद हिंदुराव यांचा उमेदवारी भरताना अजितदादा पवार स्वता उपस्थित होते हा मुरबाडच्या राजकारणातील पहिलीच वेळ होती की एवढा मोठा नेता उमेदवारी भरण्यासाठी आला .
त्यामुळे मुरबाड विधानसभेत नवचैतन्य कार्यकर्त्याना यावेळी दिसुन आले बदलापुरचे प्रशांत दामले,राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष दशरथ तिवरे,कल्याणचे विकास कुंभार,राष्ट्रवादी नेते कालीदास देशमुख,सुभाष पिसाट,सुमनकाकू शांतारामभाऊ घोलप यांच्यासह मोठया प्रमाणात नेते कार्यकर्ते उपस्थित होते तरूणांची प्रचंड उपस्थिती होती.


Post a comment

 
Top