BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
काँग्रेसच्या काळात होत असलेल्या आत्महत्या आम्ही
थांबवू असे म्हणत हे सरकार सत्तेवर आले आणि यांच्या पाच वर्षांच्या काळात तब्बल 14
हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. या सरकारच्या
बेबंदशाही कारभाराला रोखण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे मी
अत्यंत विचारपूर्वक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याचे ठरवले. सत्ताधाऱ्यांची
मस्ती उतरवण्यासाठी प्रबळ आणि खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. यांना कोणीतरी प्रश्न
विचारणारा हवा. यांच्याशी कोणीतरी भांडणारा हवा. राज्याप्रमाणे केंद्रातही सक्षम
विरोधी पक्षाची उणीव असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठारे यांची दहीसर इथं
सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांच्या झंझावाती प्रचार सभांना सुरूवात झाली आहे.राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप
सेना युतीवर जोरदार निशाना साधला. प्रत्येक निवडणूकीआधी आश्वासने दिली जातात.
जाहीरनामे येतात. पुढारी, कार्यकर्ते हारतुरे घेऊन येतात मात्र यानंतरही सामान्य जनतेला
मिळत काय. गड्डे पडलेले रस्ते, पोकळ आश्वासने. सामान्य जनतेचा आवाज बनण्यासाठी या
राज्याला एका सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. जनतेच्या मनातील आवाज होण्यासाठी
मी तुम्हाला जगावेगळी मागणी घालत आहे. आम्हाला विरोधक म्हणून संधी द्या असं आवाहन
राज ठाकरे यांनी उपस्थितांना केलं.
Post a comment