BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54
आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न
उपस्थित होत आहे. दरम्यान शिवसेनेच्या सर्ऴ विजयी आमदारांची दुपारी 12 वाजता
मातोश्रीवर बैठक होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन
शिवसेनेचाच मुख्यमंत्री करावा ही मागणी आमदार करणार आहेत. याच काळात भाजपचा दबाव
वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.भाजपला या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश
मिळवता आलेले नाही. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची अपेक्षा होती. मात्र
सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना पुरेसे बहुमत मिळालेले नाही. महायुतीच्या बळावर
ते सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होणार आहेत. दरम्यान आता शिवसेनेचा भाव मात्र
वाढला आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही आता रस्सीखेच सुरू झालेली पाहायला मिळते. शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी
त्यांनी जागावाटपाच्या वेळी वाटाघाटी केल्या परंतु आता प्रत्येक वेळी अडचण समजून
घेणार नसल्याचं सांगितले आहे.
Post a comment