0
BY - गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड येथिल सारिका हॉटेल जवळ एसटी ची समोरासमोर जोरात धडक झाल्याची घटना काही क्षणापुर्वी घडली आहे.
हि घटना अत्यंत भयानक घडली असून या धडकेत वाहन चालक व 12 ते 13 प्रवासी जखमी झाले आहे.त्यामध्ये एक प्रवासी अत्यंत गंभीर जखमी असून त्याला पुढिल उपचारासाठी सेंट्रल येथिल रूग्णालयात नेण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
याच बस मागे कार असल्याने त्या कारची ही धडक झाली असुन कारमधील नामवंत व्यक्ती जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.सदर एस.टी महामंडळ बस तुळर्इ मुरबाड प्रवास करणारी असल्याचे कळत असून यामध्ये विढे गावातील 2 व्यक्ती असल्याने तेही गंभीर असल्याचे कळत आहे.नेहमी खाजगी बस व एस.टी महामंडळ वेगात असते कधी तोल जातो कधी अपघात होतो याचा फटका मात्र प्रवाशांनाच बसतो असा फटका की जो जिवावर खेळला जातो परंतू शासन खाजगी बस चालक व एस.टी महामंडळाच्या बस चालकाला गाडीच्या मर्यादेच्या गतीला थांबवण्यास अपयशी ठरली जाते.
आणि त्याचा परिणाम प्रवासी चालकांना आपला जीव गमावून करावा लागतो.याकडे शासनाने पारदर्शी लक्ष केंद्रीत करून त्यावर जी.आर काढला पाहिजे व त्यात 70 ते 80 च्या गतीला सील केले गेले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.सदर मुरबाड च्या अपघातावेळी आजूबाजूचा संपुर्ण परिसर धाऊन अपघात प्रवाशांना गाडीतून बाहेर काढत त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न सध्या करित आहेत.तर काही रूग्णांना मुरबाड ग्रामीण रूग्णालयात आणून उपचार सुरू आहेत.


Post a comment

 
Top