0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
चंद्रयान-2 नंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) कौतुक केले आहे. इस्रोची चंद्रयान-2 मोहिम अत्यंत प्रेरणादायी असल्याचंही नासानं म्हटलं. विशेष म्हणजे नासाने इस्रोला मोठी ऑफरही दिली आहे.चंद्रयान-2 मोहिमेत विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग पूर्ण होण्यासाठी अवघे काही क्षण बाकी असताना इस्रोचा लँडरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर देशभरातून इस्रोच्या कामाची प्रशंसा झाली. तसेच इस्रोला भविष्यातील कामासाठी सदिच्छा देण्यात आल्या. आता नासाने देखील इस्रोच्या कामाचं कौतुक केलं आहे.

Post a comment

 
Top