0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी (28 सप्टेंबर) आयएनएस खंडेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. आयएनएस खंडेरीमुळे नौदलाची ताकद वाढली आहे. या पाणबुडीला नौदलाची ‘सायलन्ट किलर’ असंही म्हटलं जात आहे.आयएनएस खंडेरी पाणबुडी भारताची दुसरी स्कॉर्पियन वर्गातील पाणबुडी आहे. या पाणबुडीला पी-17 शिवालिक वर्गातील युद्धनौकेसोबत नौदलात दाखल करण्यात आलं. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः या युद्धनौकेला हिरवा झेंडा दाखवला. आयएनएस खंडेरीच्या नौदलातील समावेशासह भारतीय नौदलाची ताकद प्रचंड वाढली आहे.

Post a comment

 
Top