0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड ( Murbad ) तालुक्यातील चिखले येथे दिपक हरड (Dipak Harad) यांचे घरी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.रविवार दि.08/09/2019 रोजी या सप्ताहाला प्रारंभ करण्यात आले.यावेळी संपुर्ण चिखले गावातील व तालुक्यातील संपुर्ण माळकरी,टाळकरी,वारकरी,भक्तगण या सप्ताहाला ह.भ.प यांचे भजन,किर्तन, हरिपाठ,जागर, प्रवचन एैकण्यासाठी येत असतात.टाळ,मृदृंगाच्या गजरात सर्व भक्तगण या सप्ताहात सामील होतात.याच सप्ताहाचे औचित्य साधत श्री सत्यनारायणाची महापुजेचा ठेवण्यात येते.याच श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन येत्या शनिवारी 14/09/2019 रोजी केले असून सहकुटूंब सहपरिवारांनी तिर्थ प्रसादाचे लाभ घ्यावे असे सर्वांना आमंत्रण हरड परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. दिपक हरड हे सामाजिक कार्याबरोबर देवधर्म करित माणूसकी जोडून सदभावना टिकून ठेवण्याचे नेहमी कार्य करत असतात.त्यांच्या या अखंड हरिनाम सप्ताहाला शेकडो माळकरी,टाळकरी, वारकरी,भक्तगण मोठया संख्येने सामील होतात.


Post a comment

 
Top