0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला लागलेल्या गळतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे. परंतु, पक्षात नव्याने जोश भरण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरणार आहेत. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करत आहेत. भाजपचे हे चक्रव्यूह भेदण्यासाठी आता शरद पवारांनी स्वत: तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा आहे. पुढच्या आठवड्यात शरद पवारांच्या या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

Post a comment

 
Top