0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – शहापुर |
शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी राज्यभर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने मुंबईतील रंगशारदा रिक्लमेशन बांद्रा  येथे राज्यभरातील शिक्षकांना गौरविण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील चेरवली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक गंगाधर गणपत ढमके यांचा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षक आमदार कपिल पाटील, आयुक्त सोळंखी आदी उपस्थित होते.डॉ.श्री.गंगाराम गणपत ढमके हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जि.प. शाळा चेरवली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत,त्यांनी एम.ए, डी.एड,. बी.एड, एम.एड नेट, पीएच. डी, साहित्यभूषण अशा प्रकारचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर स्वतःचीही शैक्षणिक गुणवत्ता वाढवून एक आदर्श निर्माण केला आहे.‘प्रा. केशव मेश्राम यांच्या साहित्याचा समग्र अभ्यास’  या विषयात मुंबई विद्यापीठातून पीएच.डी मिळवली असून ते एक उत्तम साहित्यिक, निवेदक, गायक, संगीतकार आहेत.त्यांची एकूण सेवा 24 वर्षे पूर्ण झाली आहे.शाळा डिजिटल करून तंत्रज्ञानाचा ते अध्यापनात वापर करतात. विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून ते विविध उप्रकम राबवतात, डॉ. ढमके सरांनी स्वतः लेखन व संगीतबद्ध केलेली देशभक्तीपर गीते घेऊन त्यांच्या जि.प. शाळा चेरवली शाळेने सलग सहावर्षे समूहगायन स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम येऊन आपला ठसा कायम राखला आहे.शालेय स्तरावर ‘लेखक आपल्या भेटीला’, ‘एक तास वाचनालयात’, ‘सैनिक आपल्या भेटीला’, आनंद मेळावा, बालकवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शालेय वातावरण आनंदायी करण्याचा ते प्रयत्न करतात.‘आला आला श्रावण दारी’ या उपक्रमांतर्गत गेली चारवर्षे श्रावण महिन्यात सायंकाळी पुस्तकरूपी अध्यायांचे वाचन. त्यात पहिल्या वर्षी  साने गुरूजींच्या ‘शामची आई’ दुसर्‍या वर्षी अरूण गोखले लिखित ‘शिवरायांच्या शौर्यागाथा’ तिसर्‍या वर्षी अरूण शेवते लिखित ‘नापास मुलांची गोष्ट’ आणि ह्यावर्षी ‘जागर जाणिवांचा’ या पुस्तकांचे गावात पारायण करून शाळा घराघरात नेण्याचा प्रयत्न केला आहे.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, निवेदन व गायन.आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा यासाठी मार्गदर्शन करतात.राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शकाचे काम करतात.महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रकाशित होणार्‍या जीवन शिक्षण मासिकात, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात लेखन तसेच शहापूर येथून प्रकाशित होणार्‍या किल्ले माहुली या साप्ताहिकात ‘गंगाजल’ हया सदरात लेखन केलेले आहे. दैनिक जनादेश या वृत्तपत्रात चिंतन या सदरात लेखन करीत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर ‘चिंतन’ सदरात ते लेखवाचन करतात. ‘तिच्या कविता’ कवितासंग्रह, ‘संकेत’कथासंग्रह आणि ‘माणूस घडताना’ ललित लेखसंग्रह हि त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.‘संकल्प 2004’ व ‘संकल्प 2005’  या दिवाळी अंकांचे संपादन,‘सौदा जमिनीचा’ या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शनकरून ते ‘सकाळ करंडक’ एकांकिका स्पर्धेत दिनांक 15 जाने.2010 रोजी कला, विज्ञानव वाणिज्य महाविद्यालय, किन्हवली तर्फे सादर केले.

Post a comment

 
Top