0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – नवी दिल्ली
भारतीय वायूदलाच्या एअरस्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झालेल्या बालाकोटमध्ये पाकिस्तानने पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव सुरु केल्याचे समोर आले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, बालाकोटचा दहशतवादी तळ पाकिस्तानकडून पुन्हा कार्यरत करण्यात आला आहे. यावरून एक बाब स्पष्ट होते की, भारतीय वायूदलाच्या एअरस्ट्राईकमध्ये या तळाचे नुकसान झाले होते. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर हानी झाली होती. मात्र, आता याठिकाणी पुन्हा लोकांची जमवाजमव सुरु झाल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले. 

Post a comment

 
Top