0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
भूतानमध्ये भारतीय लष्कराचे चीता हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये दोन पायलट शहीद झाले आहेत. हे हेलिकॉप्टर लष्कराच्या ट्रेनिंग टीमचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी 1 वाजता भूतानच्या योंगफुला येथे ही घटना घडली. अरुणाचल प्रदेशाच्या खिरमू येथून योंगफुलाकडे जात असताना हे विमान कोसळले. यामध्ये दोन पायलट शहीद झाल्याचे आर्मीचे प्रवक्ते, कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं.

Post a comment

 
Top