0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
परदेशात नोकरी करण्याचे आकर्षण प्रत्येकाला असते. पण परदेशात नोकरीला लावतो असे सांगून आतापर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे. कुणाचे पैसे घेतले पण नोकरी दिली नाही, तर कुणाला पैसे घेऊन परदेशात पाठवले पण पगार नाही, अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. असाच प्रकार भिवंडीतील एका महिलेसोबत घडला आहे. भिवंडी शहरातील घरकाम करणाऱ्या दोन महिलांना दुबईत (Dubai) काम देतो, असं सांगून त्यांची फसवणूक केली आहे. नूरजहाँ गुलाब शेख असं या फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे.

Post a comment

 
Top