0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - औरंगाबाद 
औरंगाबादमध्ये प्रसिद्ध उद्योजकाची पत्नीनेच चाकूने भोसकून हत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे. शैलेंद्र राजपूत यांची पत्नी पूजा राजपूत हिने हत्या केली असून घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.औरंगाबादमधील उल्कानगरी परिसरातील खिंवसरा पार्कमध्ये सोमवारी रात्री दीड वाजता हत्येचा थरार घडला. 40 वर्षीय शैलेंद्र शिवसिंग राजपूत यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.

Post a comment

 
Top