0
( बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क - कुणाल शेलार,9623609100 )
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - औतुर |
     श्री.गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्दयालयाने महाविद्दयालयात नवीन प्रवेश घेणार्‍या विद्दयार्थ्यांना महाविद्दयालयाची ओळख व्हावी यासाठी " फ्रेशर पार्टीचे " आयोजन दि.31.08.2019 रोजी करण्यात आले होते.
          कॉलेज लार्इफमध्ये प्रवेश करतांना विद्दयार्थी काहीसे बावरलेले असतात या मुलांना कॉलेजची तसेच सिनिअर्सची ओळख व्हावी यासाठी फ्रेशरपार्टीचे आयोजन महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.गणेश दामा तसेच कल्चरल इनचार्ज प्रा.शितल बिडकर यांनी केले.पार्टीत नवीन विद्दयार्थ्यांना मनसोक्त मजा करण्याचं आणि त्यात सिनिअर्सनीही  आपल्या वाटची मजा करून घेण्याच एकमेव निमित्त म्हणजे ही फ्रेशर पार्टी होय.सदर पार्टीत छोटीसी थीम "आरंभ" डी.जे  चा ठेका आणि सकाळी व संध्याकाळी मनसोक्त भोजनांची सोय अशा आगळया वेगळया डिंगोरे येथील " निलम गार्डन" च्या वातावरणात ही फ्रेशर पार्टी घेण्यात आली.नवीन विद्दयार्थ्यांच्या टॅलेंटचं प्रदर्शन त्यासाठी विविध गेम्स खेळण्यात आले.त्यामध्ये मिस्टर फ्रेशर बॅचलर ऑफ फार्मसी चा आकाश बढे डिप्लोमा इन फार्मसी चा हांडे पर्जन्य आणि मिस फ्रेशर श्रध्दा पानसरे व मयुरी कराळे यांची निवड करण्यात आली.
पार्टी म्हंटले की थीमला साजेसे कपडे घालण्याचं स्वातंञ्य,जरी विद्दयार्थ्यांना असलं तरी त्यांचा स्वैराचार समजून दुरूपयोग करू नये या विषयावर महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.गणेश दामा यांनी विद्दयार्थ्यांना मार्गदर्शन केले.उर्वरित कार्यक्रम व्यवस्थीत पार पाडण्यासाठी महाविद्दयालयाचे प्रा.देव्हडराव,प्रा.सुमीत जोशी,प्रा.सुनिल हारेर,प्रा.विजय वाकळे,प्रा.अस्मिता गायकवाड,प्रा.चेतन पुलाटे,प्रा.अजिंक्य दिघे,प्रा.मंगल शेळके यांनी विेशेष मेहनत घेऊन सहकार्य केले.

Post a comment

 
Top