0
BY -  ः मयुर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
पाण्यापासून पक्षी,पशु मरताना एैकले आहेत परंतू कधी असे ऐकले का की दरवर्षीप्रमाणे गणपत्ती बाप्पाच्या विसर्जनाला पाणीच नाही .असे दुर्देव सध्या महाराष्ट्रातील लातूर जिल्हयात पाहायला मिळाला आहे.लातूर येथील गणेशाच्या  विसर्जन दिवशी पाणी नसल्याने गणेशाचे विसर्जन झाले नसल्याने चक्क 28 हजार गणेशाच्या मुर्त्या मंडळाकडे सुपुर्त करण्यात आले.दुष्काळग्रस्त लातुरमध्ये पाणीअभावी प्रथमतः गणेशाचे विसर्जन झाले नाही ही मोठी खेदजनक बाब आहे.तिकडे लाखो करोडो स्मारक,रस्ते,इमारती मध्ये खर्च केले जाते,भ्रष्टाचार वाढत असताना दुर्लक्ष केले जाते परंतू अशा गंभीर बाबीकडे लक्ष न वेधता आपआपल्या निवडणूकीच्या प्रचाराकडे वळले असून टँकर मार्फत पाणी पोहोचवले असते किंवा मातीच्या गणेशासाठी डबक्यात पाणी साठा करून मुर्तीचे विसर्जन केले असते व पि.यु.पी च्या मुर्त्या जर एका ठिकाणी नेऊन योग्य निर्णय घेऊन नियोजनबध्द उपाययोजना केले असते तर ही वेळच आली नसती त्यामुळे राज्याचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जुन लक्ष घालणं गरजेचे होते तसे न झाल्याने मुख्यमंत्री साहेब त्या गणेशाच्या 28 हजार मुर्त्या विसर्जन न करता तशाच राहून मंडळाकडे देण्यात आले ही ऐतिहासिक बाब असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे समोर आले आहे.ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून नियोजन करून दिलेल्या शब्दास कटिबध्द राहा आणि गांभिर्यतेने लक्ष घालत जा असा संतप्त टोला मुरबाड विकासमंच ट्रस्टीच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी मुख्यमंत्री यांना लगावला आहे.

Post a comment

 
Top