BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कित्येक दिवासापासून मुंबर्इच्या
आझाद मैदानावर आरोग्य विभागाच्या कंत्राटी परिचारिकांनी न्यायासाठी आणि विविध मांगण्यासाठी
आपले धरणे आंदोलन, उपोषण सुरू केले होते.आझाद मैदानावरील महिला महाराष्ट्रातून जमले
आणि शेवटच्या घटकांपर्यंत न्यायाचा नारा लगावला.त्यामध्ये एका महिलेची प्रकृती खालावली
परंतू तिनेही माघार घेतली नाही.त्या खालावलेल्या महिलेनेही आहे त्या अवस्थेत जाहिर
पाठिंबा दिला.पोलिसांचा बंदोबस्त कडक्याने लागला होता.
अखेर मुंबर्इच्या वतीने आरोग्यमंञ्यांना
निवेदन देण्यात आले या निवेदनानंतर आश्वासने दिल्याने व आपले उपोषणे,आंदोलने थांबविण्यात
आले.जर आझाद मैदानावर महिलांनी उपोषणे गाजवले नसते तर आजपर्यंत महिलांना प्रतिक्षाची
भुमिकाच समोर राहिली असती.म्हणून त्या महिलांनी परिचारिकांनी मुंबर्इचा आझाद मैदान
गाजवले अखेर आश्वासनानंतर आपले उपोषण थांबवले असेच समोर आले आहे.यामध्ये श्रीमती दुर्गा
भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे,पालघर जिल्हयातील तसेच मुरबाड तालुक्यातील विनिता
चव्हाण,सोनल पवार,पुनम आगिवले,योगिता जाधव,प्रमिला रोकडै,पूजा मोहपे,मोनिका लाटे व
हजारो महिलांच्या संख्येने आझाद मैदानावरील
उपोषण ,आंदोलनात सामील झाले होते.
Post a comment