0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ (विशेष प्रतिनिधी) |
रेल्वे रुळाच्या कडेला भाजीपाल्याची शेती करून उदरनिर्वाह करणाऱया एका माळ्याने छत्री हलवून प्रसंगावधान दाखवल्याने कांजूरमार्ग ते भांडुपदरम्यान मोठा लोकल अपघात टळला. माळ्याने डाऊन जलद मार्गावरील रुळांना पडलेल्या तडय़ाकडे वेळीच लक्ष वेधले. ही घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गाची वाहतूक खोळंबल्याने ऐन सणासुदीच्या गर्दीत लोकल प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
माळी दर्शन सिंग यांचे कौतुकया घटनेमुळे डाऊन जलद मार्गाच्या लोकल डाऊन धीम्या मार्गाने वळविण्यात आल्या. त्यानंतर रुळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तब्बल सवा तासानंतर रुळांच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले.

Post a comment

 
Top