0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – उत्तर प्रदेश |
उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील हिंदुस्तान पेट्रोलियम प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. गॅस टँकचा व्हॉल्व्ह लीक झाल्यानंतर हा स्फोट झाला. या घटनेत डझनभर लोक जखमी झाले आहेत. अनेक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून प्लांटच्या सभोवतालच्या परिसरात रहदारी रोखण्यात आली आहे.शहरातील दही चौकी येथे असलेल्या एचपीसीएल गॅस प्लांटला गुरुवारी सकाळी गॅस अपलोड करत असताना टँकरचा व्हॉल्व्ह लीक झाल्याने आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एचपीसीएलच्या आवारातील कर्मचार्‍यांनी अग्निशमन यंत्रणा सुरू केली. 35मिनिटांच्या अग्निशामक कारवाईनंतरही आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. यामुळे टँकरचे टायर फुटले. या स्फोटात प्लांट ऑफिसरसह डझनभर लोक जखमी झाले.

Post a comment

 
Top