0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर  |
मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीकडे वाटचाल करत असून ती सध्या 39 फूट 9 इंच इतकी झाली आहे. पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट असून लवकरच नदी या पातळीकडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेले असून मागच्या 24 तासांत तब्बल 335.57 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप उघडेच असून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Post a comment

 
Top