0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई 
मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरात मेट्रोची  420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी आणि नवी मुंबईमध्ये 11.10 किमी मेट्रोच्या कामांचा समावेश आहे.मुंबई शहर व महानगर प्रदेशात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने एकूण 14 मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दहिसर ते डीएन नगर मेट्रो -2 ए कॉरिडॉर, डीएन नगर ते मंडाले मेट्रो-2 बी, वडाळा ते कासारवडवली मेट्रो -4, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो – 6 कॉरिडॉर आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो -7 कॉरिडॉर यांचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. या पाचही मार्गामुळे 88.5 किमीचे मेट्रो जाळे तयार होईल. या मेट्रो मार्गांवर जवळपास 97 स्थानके असणार आहेत. या मार्गावरून किमान 50 लाख प्रवाशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे.

Post a comment

 
Top