0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
स्वयंपाक करताना कुकरचा स्फोट होऊन एका महिलेसह मुलगा जखमी झाल्याची घटना ठाण्यात घडली. या अपघातात अनिता शर्मा (वय,३०वर्ष) आणि पियुष शर्मा (वय, २वर्ष) जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने घराचे छप्परदेखील उडाले. या स्फोटामुळे शेजारील घरांचे देखील नुकसान झाले आहे. ठाण्याच्या अंबिकानगर १ येथील मैत्री हाईट इमारती जवळच्या चाळीत हा अपघात घडला. जखमी झालेली महिला अत्यवस्थ असून तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. महिला ४० टक्के भाजली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a comment

 
Top