0
BY – नितिन(आण्णा)पुंडे, युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
भोसरी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीत चार आरोपीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते आणि तांब्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. राजेश उर्फ मुन्ना रविशंकर तिवारी (वय २३), अविनाश महादेव जाधव (वय २२), रमजान मशाक कुरणे (वय २६) आणि विकास जीवन गुंजाळ (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रात्री उशिरा भोसरी पोलीस गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी आशिष मल्लेश यांना गोपनीय माहिती मिळाली की गुडविल चौक येथे तीन लोक हे हत्यारासह थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून संबंधित ठिकाणची माहिती घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते अशी हत्यारे जप्त करण्यात आली. 

Post a comment

 
Top