BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत
(एन.एच.एम) कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचार्यांना सरळ सेवेत समायोजन
करण्यासाठी 40 टक्के कंत्राटी कर्मचार्यांना समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून
आजतागायत कोणत्याही महिलेला न्याय मिळालाच नाही.त्यासाठी 10 ते 12 वर्षे काम करणार्या
त्या एन.एच.एम महिलांनी अखेर शासनाच्या विरोधात आझाद मैदानात 3 ते 4 दिवसापासून आंदोलनाचा
नारा लगावला आहे.
त्यांची बदली,पे प्रोटेक्शन,कंत्राटी कर्मचारी यांस कमी न करता तात्काळ
समायोजन तसेच पगारात वाढ अशा अन्य मागण्या असून अद्दयाप कोणत्याही प्रकारे गांभिर्यतेची
दखल घेतली गेली नसल्याने महिलांना अखेर आझाद मैदान गाठावे लागले आहे.आजपर्यंत कधी कोणत्याही
महिला आझाद मैदानावर आपल्या रोजंदारीसाठी व महिलेची लाज राखून ठेऊन रस्त्यावर उतरल्या
नव्हत्या परंतु अलीकडे उलट उत्तरे विविध निर्णय रद्द करण्यासाठी पत्रे काढल्याने सरकार
सर्व कंत्राटी म्हणून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एन.एच.एम)
कर्मचार्यांची पिळवणूक करित असल्याचे दिसून आले आहे.कित्येक वर्षे आरोग्य सेवेत कर्मचारी
काम करत आले आहे परंतू सध्या अन्याय सहन करणार नसल्याचे महिलावर्गांकडुन सांगण्यात
आले असता विपरित परिणाम होऊ नये म्हणून आझाद मैदानावर आंदोलनाचा मार्ग अवलंबायला लागला.सकारात्मक
निर्णय विचारात घेतले नसून नकारात्मक विचाराला प्राधान्य देऊ नका मुख्यमंत्री साहेब,आरोग्यमंत्री
साहेब जरा त्या कंत्राटी महिलांच्या उपोषणाकडे एकदा तरी पारदर्शक लक्षतेची दुरदृष्टी
दाखवा त्यातील एक महिलेची आंदोलन करतावेळी तब्येत खालावली आहे अन्यथा हे आंदोलन पुढे
आत्मदहन विषयाकडे ओढले जाऊ शकते.महिलांनी धडक यात्रा सुरू केली असून मंत्रालयासमोर
ठाण मांडून बसू व जो पर्यंत मागण्या पुर्ण होणार नाहीत महाराष्ट्रातील सर्व 5 ते 8
हजार महिला आंदोलने,उपोषणे,मोर्चा थांबवणार नाही त्यामुळे लक्ष घाला व न्यायाच्या प्रतिक्षेत
असणार्या माझ्या महिलांना न्याय मिळवून द्दया अशी मागणी मुरबाड विकासमंच ट्रस्टच्या
अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी केली आहे.आज हजारो महिला एकवटले उद्दया हजाराचा
आकडा लाखोत व्हायला वेळ लागणार नाही तरी आपल्या यात्रेतून थोडा वेळ काढा आणि आझाद मैदानावर
जाऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळवून द्दया.ज्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत
एन.एच.एम नी आपले आयुष्य सेवेसाठी घालवले त्यांच्यावर अन्याय नका होऊन देऊ कारण आपले
घरबाळ,कुटूंब बाजूला सरूनच प्रथम शासनानी टाकलेल्या त्यांच्या विश्वासाला खरे उतरतात
अशा महिलांना मुख्यमंत्री साहेब,आरोग्यमंत्री साहेब विचार करा अन्यथा साम,दाम,दंड,भेद
प्रकार घडून आला त्याला जबाबदार शासन राहिल याची दक्षता घ्यावी अशी संतप्त घोषणाही
सर्व महिलांनी दिली.
Post a comment