0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाईव्ह - शहापूर  
महाराराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात,तालुक्यात ज्यांनी अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी व आपले महाराज यांच्या निर्भिड,शौर्य,स्वायत्त महाराष्ट्राची कारकिर्द आपल्या व्याख्यानमालेतून हजारो लाखो जनतेसामेरे आणून दिली व आपले महाराज कसे तर वाघा सारखे सर्व जनसामान्यांची रक्षा करणारे एक अविस्मरणीय छत्रपती महाराज यांच्या जिवनमालेच्या कार्याविषयी आपल्या व्याख्यानेतून लाखो तरूणांच्या हृदयात महाराजांच्या कार्याची छबी उमटवून देणारे शहापूर तालुक्यातील किन्हवली गावातील प्रख्यात व्याख्यानकर्ते म्हणून नवनीत यशवंतराव यांची ओळख नवीन नाही.त्यांनी आजपर्यंत कित्येक व्याख्येन मालेतून महाराजांची किर्ती बेभान सांगितली आहे.यशवंराव यांच्या अत्यंत कमी वयातच शेकडो व्याख्यान अराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अंगावर शहारे येतील अशा स्वरूपात मांडले आहे.नवनीत नंदकुमार यशवंतरावांनी आजपर्यंत सादर केलेल्या व्याख्यानामुळे महाराष्ट्राचे लाडके व्याख्याते म्हणून त्यांची ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजाच्या वतीने भुषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या पुरस्काराने सन्मानित केल्याने ठाणे जिल्हयातील मुरबाड,शहापूर,उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर,भिवंडी व अन्य भागातील नागरिक शिवभक्तांनी नवनीत यशवंराव यांचे अभिनंदन करत यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा देत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्भिडतेची कार्यप्रणाली व्याख्यन मालेतून संपुर्ण देशभरातगेले पाहिजे व त्यांनी केलेल्या सर्व धर्म समभावाची निष्ठा ज्वलंत राहावी ती आपल्या व्याख्यान मालेतून म्हणून  सर्वांनी आपेक्षा बाळगली आहे त्याचबरोबर व्याख्याते नवनीत यशवंतराव यांचे मुरबाड विकासमंच ट्रस्टकडूनही अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top